शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: न्यूयॉर्क , सोमवार, 5 सप्टेंबर 2011 (12:54 IST)

जोकोविच, फेडरर, वोझ्नियाकी, सेरेनाची आगेकूच!

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नोव्हाक जोकोविच, दुसरा मानांकित राफेल नदाल, तिसरा मानांकित रॉजर फेडरर, महिला विभागात अव्वल मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकी व तीनदा विजेतेपदाचा मान मिळवणारी सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकेन ओपन टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन चॅम्पियन जोकोविचनने कामगिरीत सातत्य राखताना डेव्हिडेन्कोचा ६-३, ६-४, ६-२ ने पराभव करत वर्षातील ६0 वा विजय नोंदवला. नदालने नालबांडियनवर ७-६, ६-१, ७-५ ने मात केली. फेडररला क्रोएशियाच्या मारिन सिलिचविरुद्ध विजय मिळवताना चार सेटस्पर्यंत झुंज द्यावी लागली. त्याने ६-३, ४-६, ६-४, ६ -२ ने विजय मिळवला.

सेरेनाने चौथ्या मानांकित बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाचा ६-१, ७-६ ने पराभव केला. व्होझ्नियाकीने अमेरिकेच्या व्हॅनिया किंगचा ६-२, ६-४ ने सहज पराभव करत आगेकूच कायम राखली.