शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

'ते' पदक खुदोखोजच्या कुटुंबीयांनीच ठेवावं : योगेश्वर

मुंबई- योगेश्वरने दिलदारपणा दाखवत रौप्यपदक पदक दिवंगत पैलवान बेसिक खुदोखोजच्या कुटुंबीयांनीच ठेवावं असं म्हटलं आहे. योगेश्वरने ट्वीट करत खुदोखोजच्या कुटुंबीयांनी त्यांच्या दिवंगत मुलाचं पदक स्वतःजवळ ठेवावं, असं म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
 
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा पैलवान योगेश्वर दत्तला रौप्यपदक मिळणार असल्याचं वृत्त मंगळवारी आलं. मात्र त्यानंतर योगेश्वरने दिलदारपणा दाखवत रौप्यपदक पदक दिवंगत पैलवान बेसिक खुदोखोजच्या कुटुंबीयांनीच ठेवावं असं म्हटलं आहे.
 
लंडन ऑलिम्पिकपूर्वी दोन महिने मी रशियात प्रशिक्षण घेत होतो. त्यामुळे बेसिकशी माझी खूप छान ओळख झाली होती. खुदोखोज हा चांगला मित्र होता, त्यामुळे त्याचं रौप्यपदक घेणं मला विचित्र वाटत आहे, असं योगेश्वर दत्त म्हणतो.