शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: पट्टाया , मंगळवार, 14 फेब्रुवारी 2012 (12:23 IST)

पट्टाया ओपन टेनिस स्पर्धेत सानियाला दुहेरीत विजेतेपद

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनास्तॅशिया रोडियोनोवाच्या साथीने पट्टाया ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवले. सानिया रोडियोनोवा जोडीने अंतिम फेरीत चीन तैपेईच्या हो चिंग चान आणि युंग जान चान या जोडीवर तीन सेटच्या चुरशीच्या लढतीत 3-6, 6-1, 10-8 अशी मात केली.