शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: कोलकाता , गुरूवार, 9 फेब्रुवारी 2012 (12:24 IST)

पेससोबत पुन्हा जोडी नाही : भूपती

रोहन बोपन्ना चांगला खेळाडू आहे. त्याच्याशी माझे सूर जुळत आहेत. आमच्यासमोर संपूर्ण हंगाम आहे. त्यात चांगली कामगिरी करण्याचा आपला इरादा आहे, असे सांगत टेनिसपटू महेश भूपतीने आगामी काळात लिएंडर पेससोबत पुन्हा जोडी जमवणार नसल्याचे स्पष्ट संकेत बुधवारी दिले.

लिएंडर पेससह अनेक ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवलेल्या महेश भूपतीने यंदाच्या हंगामात युवा टेनिसपटू रोहन बोपन्नासह दुहेरीत जोडी जमवली आहे. पेस आणि भूपती ही जोडी गेल्या हंगामात एक‍ि खेळली होती. मात्र, यंदा त्यांनी पुन्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय पेसचा होता. यावर भूपतीने आश्चर्यही व्यक्त केले होते. त्यानंतर त्याने रोहन बोपन्नाशी दुहेरीत जोडी जमवली होती.