शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मोनॅको , बुधवार, 13 एप्रिल 2011 (15:18 IST)

रॉजर फेडररचा क्‍ले कोर्टवर प्रभाव

मॉंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररने पूर्वीसारखाच धडाकेबाज खेळ करीत तिसरी फेरी गाठली. त्याने जर्मनीच्या फिलिप कोलश्‍क्रायबर याचा 6-2, 6-1 असा पराभव केला. मोसमातील पहिल्याच क्‍ले कोर्टवरील फेडररचा खेळ लक्षवेधी ठरला.

या लढतीपूर्वी सारी चर्चा नोव्हाक जोकोविच याचा फॉर्म आणि त्याने रॅफेल नदाल याच्यावर मिळविलेल्या वर्चस्वासंदर्भातच होत होती. अशावेळी फेडररने क्‍ले कोर्ट असले तरी आपले आव्हान अगदीच मोडीत काढले जाऊ नये, असाच इशारा दिला.