शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 21 फेब्रुवारी 2012 (12:25 IST)

सानिया मिर्झा, सोमदेवचे मानांकन घसरले

भारताचे टेनिसपटू सानिया मिर्झा आणि सोमदेव यांचे मानांकन घसरले. जागतिक महिला मानांकनात सानियाला ऐके‍रीच्या क्रमवारीत 16 स्थानांचा फटका बसला असून ती 97व्या स्थानावरून 113व्या स्थानी घसरली आहे. गेल्यावेळी ती 111व्या स्थानावरून 97व्या स्थानी गेली होती. व्यावसायिक टेनिस संघटनेच्या ताज्या मानांकनात पुरुष गटात भारताच्या देववर्मनचे मानांकन 122 झाले आहे.

त्याला दोन स्थनांचा फटका बसला आहे. दुहेरीत मात्र सानिया सातव्या स्थानी कायम आहे. तर पुरुष गटात लिएंडर पेस सातव्या स्थानी आहे. महेश भूपती 15व्या स्थानी कायम आहे. रोहन बोपन्ना 11व्या स्थानी आहे.