Last Modified: इंडियाना वेल्स , मंगळवार, 13 मार्च 2012 (12:00 IST)
सानिया-वेस्निना तिसर्या फेरीत
WD
इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि रशियाची एलेना वेस्निना यांनी महिला दुहेरीच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला.
दुसरे मानांकन मिळालेल्या या इंडो-रशियन जोडीने दुसर्या फेरीत स्वीत्झर्लंडची टिमिया बाकसिंजकी आणि इटलीची अल्बर्टा ब्रियांटी या जोडीचा 6-1, 3-6, 10-2 असा पराभव केला.