शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2011 (13:14 IST)

सानियाने केली 25 हजार डॉलर्सची मागणी!

WD
भारतीय टेनिस सनसनी सानिया मिर्जाने पाकिस्तान टेनिस संघाला नकार देऊन त्याला अडचणीत टाकले आहे. पाकिस्तान टेनिस महासंघाची इच्छा होती की सानियाने पूर पिडितांच्या मदतीसाठी लाहोरयेथे प्रदर्शन सामना खेळावा, पण त्यासाठी सानियाने 25 हजार डॉलर्सची मागणी केली आहे.

सानियाने पाकिस्तान टेनिस महासंघ पीटीएफ (पीटीएफ)ला सांगितले की ती पूर पिडितांच्या मदतीसाठी तेव्हाच प्रदर्शन सामना खेळेल जेव्हा तिला 25 हजार डॉलर्सच्या राशी देण्यात येईल.

पाकिस्तान टेनिस महासंघाचे कार्यवाहक अध्यक्ष इरशाद भाटी यांनी सांगितले की महासंघाला सानिया आणि क्वेटा पेश्चकेमध्ये हा मॅच आयोजित करायचा होता. पेश्चके पाकिस्तानी टेनिस स्टार ऐसाम उल हक कुरैशीची मिश्रित युगल जोडीदार आहे.

भाटी यांनी सांगितले की सानिया मिर्झा लाहोर येथे खेळण्यास तयार नव्हती आणि नंतर तिने मॅचसाठी उपस्थिती शुल्क म्हणून 25 हजार डालर्सची मागणी केली. त्यांनी सांगितले की पीटीएफ तिच्या या वित्तीय मागणीची पूर्ती करण्यास अक्षम आहे.

सानियाने मागील वर्षी मलिकशी लग्न केले होते, पण ती लग्नानंतर एकदाच पाकिस्तान गेली होती जेव्हा लाहोरामध्ये तिचा वलीमा झाला होता. हे दोघेही लग्नानंतर दुबईत राहत आहे. सानियाने स्पष्ट केले आहे की तिला भारतीय होण्याचा गर्व आहे आणि भारतीय नागरिकता सोडणार नाही.

ते पुढे म्हणाले की सानियाला घेऊन मॅचची शक्यात पूर्णपणे संपली आहे पण आता आमची ऐसाम आणि त्याचे भारतीय जोडीदार रोहन बोपन्नाला घेऊन वाघा सीमेवर मॅच आयोजित करायची इच्छा आहे.

पाकिस्तान टेनिस महासंघाने सांगितले की ऐसाम आणि बोपन्नामध्ये ऐकलं सामन्यासाठी 80 टक्के कार्य संपन्न झाले आहे आणि पीटीएफ डिसेंबरामध्ये वाघा सीमेवर हा मॅच आयोजित केला जाईल.

त्यांनी सांगितले की दोघेही खेळाडूंनी या मॅचमध्ये खेळण्याची इच्छा जाहीर केली आहे. भाटीने सांगितले की ाकिस्तानामध्ये टेनिसला बढावा देण्यासाठी ते अजूनही सानियाला सामील करण्याचा प्रयत्न करीत आहे.