शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सुपर सीरिज फायनलमध्ये खेळणारच!

WD
भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली नसली तरी, पुढील महिन्यात चीनमध्ये होणार्‍या सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत आपण खेळणार आहोत, असा हट्ट या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेतीने धरला आहे.

सायना म्हणाली, चीनमध्ये सुपर सीरिज स्पर्धा होणार आहे. जगातील सर्वच आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. गतवर्षी मी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत परभूत घाली होती. त्यामुळे यंदा या स्पर्धेबाबत उत्सुक आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपू युवराज सिंग आणि 22 वर्षीय सायना बुधवारी येथे आले होते.