शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: टोकियो , मंगळवार, 4 ऑक्टोबर 2011 (13:13 IST)

सोमदेव पहिल्याच फेरीत पराभूत

भारताचा स्टार टेनिसपटू सोमदेव देवबर्मन अपेक्षेप्रमाणे जपान ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गारद झाला. जागतिक क्रमवारीत 24व्या स्थानावर असलेल्या चेक गणराज्याच्या रॉडेक स्टेफनेकने सोमदेवचा 6-4 आणि 6-3 असा सहज पराभव केला.

यंदाचे सत्र सोमदेवसाठी अतिशय खराब गेले. क्रमवारीत त्याने 62वे स्थान पटकावले असले तरी यादरम्यान अनेक स्पर्धाही गमावल्या. जोहान्सबर्ग व इंडियन वेल्स मास्टर्स या दोनच स्पर्धेत तो फायनलपर्यंत धडक मारू शकला होता.