बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. T-20 वर्ल्डकप-09
Written By भाषा|

विश्वकरंडकसाठी शुक्रवारपासून महासंग्राम

टी-20 विश्वकरंडकचा जगजेत्ता ठरविण्यासाठी शुक्रवारपासून महासंग्राम सुरु होत आहे. 15 दिवस 12 संघात चालणार्‍या या सामन्यांमधून टी-20 चा बादशाह निवडला जाणार आहे. बुकींना मागील विजेता भारतालाच यावेळेचे विजेता म्हणून प्राधान्य दिले आहे.

विश्वकरंडक स्पर्धेचा उदघाटन सामना शुक्रवारी इंग्लड आणि हॉलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यापासून टी-20 चा थरार सुरु होणार आहे. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारताबरोबर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचेही नाव घेतले जात आहे.

स्पर्धेसाठी चार गटात 12 संघांना विभागण्यात आले आहे. अ गटात भारत, बांगलादेश आणि आयलंडचा संघ आहे. ब गटात पाकिस्तान, इंग्लड आणि हॉलंडच्या संघाचा समावेश आहे. क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्टइंडिज आहे. या गटात सर्वच संघ दिग्गज असल्याचे सुपर-8 साठी चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. ड गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि स्काटलंडचा संघ आहे.