भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाच्या सुरवातीच्या काळात विनम्र आणि चालाख असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या स्वभावाने सर्वांना जिंकले होते. परंतु टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत त्याची पूर्वीची प्रतिमा पाहायला मिळत नाही. दोन वर्षाच्या कालखंडात धोनीत बदल झाला असल्याची कबुली त्याने स्वता:च दिली.
आपल्या विनम्र स्वभावामुळे माध्यमांमध्ये 'कॅप्टन कूल' म्हणून धोनी प्रसिद्ध होता. परंतु आता तो बदलला आहे. याबद्दल बोलतांना तो म्हणाला,' मी ही मानव आहे. माझ्यातही काही कमतरता आहेत. बदल हा जीवनाचा भाग आहे. गेल्या दोन वर्षात मी ही बदललो आहे. परंतु मी सूचनांचा स्वीकार करण्यास नेहमी तयार असतो.'
वीरेंद्र सेहवागशी निर्माण झालेल्या मतभेदांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच धोनी कमालीचा नाराज झाला होता. दोन वर्षात प्रथमच माध्यमांशी त्याचे खटके उडले आणि संबंधही तणावपूर्ण झाले. मगे त्याने संघातील एकजुट दाखविण्यासाठी संपूर्ण संघालाच पत्रकार परिषदेत हजर केले.