भारताची वाट सोपी तर ऑस्ट्रेलियसमोर आव्हान
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताची सुरवातीची वाटचाल सोपी असून ऑस्ट्रेलियासमोर मात्र कठोर आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा गटात वेस्टइंडिज आणि श्रीलंकासारखे बलवान संघ आहे. भारताचा गटात मात्र बांगलादेश आणि आयलंडसारखे 'लिंबू टिंबू' संघ आहे. आयसीसीने विश्वकरंडकसाठी 12 संघांना चार गटात टाकले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात अव्वल स्थानावर असलेले दोन संघ पुढील फेरीत पोहचणार आहे. यामुळे सी गटातून अव्वल स्थानावरील ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्टइंडीज यातून एक संघ सुरवातीलाच बाहेर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या गटातील दोन्ही संघाविरुध्द आतापर्यत एकच सामना खेळला आहे. त्यात श्रीलंकेवर विजय मिळविला तर वेस्टइंडीजकडून पराभव पत्करावा होता. ऑस्ट्रेलिया 21 ट्वेंटी सामने खेळला असून त्यात 11 मध्ये पराभव स्वीकारला आहे. श्रीलंकेने 13 पैकी आठ तर वेस्टइंडीजने 11 पैकी चार सामन्यात विजय मिळविला आहे. भारत आतापर्यत 13 सामने खेळला आहे. त्यातील सातमध्ये विजय मिळविला आहे, तर चारमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकविरुध्दचा एक सामना बरोबरीत सुटला होता. भारताच्या गटातील बांगलादेशने दहा पैकी तीन तर आयलंडने चारपैकी तीन सामन्यात विजय मिळविला आहे. ब गटातून इंग्लड आणि पाकिस्तान पुढील फेरीत सहज पोहचणार आहे. कारण या गटात तिसरा संघ असलेला हॉलंड कमकुवत आहे. ड गटात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ बलवान असून स्काटलंडचा संघ कमकुवत आहे.