Last Modified: लंडन , बुधवार, 10 जून 2009 (14:38 IST)
'सायमंडची अनुपस्थिती महागात पडली'
ऑस्ट्रेलिया संघात अष्ट्रपैलू खेळाडू एंड्रयू सायमंड्स नसल्याने संघाचे संतुलन बिघडले. त्याची अनुपस्थिती आम्हाला महागात पडली, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉटींग याने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्टइंडिज आणि श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला. त्यावर बोलतांना पोटींग म्हणाला की, सायमंड्सची अनुपस्थिती आम्हाला महागात पडली. तो सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. त्याच्या सारख्या खेळाडूवर झालेली कारवाई आम्हाला महागात पडली.