शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वेबदुनिया|
Last Modified: वॉशिंग्‍टन , रविवार, 18 जानेवारी 2009 (12:20 IST)

ओबामांच्‍या शपथविधीचे तिकिटे संपली

बराक ओबामांचा राष्‍ट्राध्‍यक्ष पदाच्‍या शपथ विधी चिरस्‍मरणीय व्‍हावा यासाठी अमेरीकेत जोरदार तया-या करण्‍यात आल्‍या असून त्‍यांच्‍या शपथविधी कार्यक्रमाचे संपूर्ण तिकिट संपले असल्‍याचे या समारंभाचे नियोजन करणा-या कंपनीतर्फे जाहीर करण्‍यात आले आहे. ओबामा 20 जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत.

यातील पहिल्‍या दर्जाचे तिकिटतर काही मिनिटातच विकले गेल्‍याचे या कंपनीचे म्‍हणणे असून शपथ विधी दरम्‍यानच्‍या संचलन पाहण्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या पाच हजार तिकिटांपैकी 90 टक्के तिकिटे ऑनलाईन तर इतर प्रत्‍यक्ष विकली गेली आहेत.