जर्मनी आणि नेदरलँडचाही ओबामांनाच पाठिंबा
अमेरिकेत डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांना केवळ अमेरिकेतूनच समर्थन आहे असे नाही तर ओबामा यांना आपला पाठिंबा असल्याचे जर्मनी आणि नेदरलँडच्या अर्थमंत्र्यांनीही जाहीर केले आहे. गेल्या महिन्यात युरोपीय देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ओबामा यांना या देशांमधील जनतेने समर्थन दिले असून, या देशांतील सरकारनेही ओबामांनाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे.