Last Modified: वॉशिंग्टन , सोमवार, 19 जानेवारी 2009 (13:21 IST)
अशी असेल ओबामांची अत्याधुनिक कार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी अत्याधुनिक लिमोझिन कारचे आज विमोचन करण्यात आले. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित असलेल्या या काळया रंगाच्या गाडीचा फोटो प्रसिध्द करण्यात आला आहे.
जगातील सर्वाधिक शक्तिशाली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलेल्या ओबामा हे मंगळवारी पदभार स्वीकारत असून साधे पणाचे प्रतिक असलेल्या ओबामांसाठी ‘जेम्स बॉण्ड’ स्टाईलमधील खास काळी लिमोझिन गाडी दीमतीला असणार आहे.
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने या कारमध्ये अत्याधुनिक शाही सुविधांसोबतच तिला गुप्तचर यंत्रणा आणि सैन्यदलाच्या शस्त्रांनी सज्ज करण्यात येणार आहे. शपथग्रहण समारंभाला जाण्यासाठी जेव्हा ओबामा या कारमध्ये प्रवीष्ठ होतील. तेव्हाच तिच्या सुरक्षेचे गुप्तकोड सुरू केले जातील.
लिमोसिन कारची निर्मिती करणा-या जनरल मोटर्सने ओबामांसाठी नेवे मॉडल ‘केडिलेक’ तयार केले आहे. या कारचा संपर्क जगभर कुठेही जोडता येणे शक्य होणार आहे. रासायनिक हल्ले रोखण्याचीही या कारमध्ये क्षमता आहे.