Last Modified: न्यूयॉर्क , रविवार, 18 जानेवारी 2009 (14:40 IST)
'भारताशी चांगले संबंध ओबामांसाठी हीतकारक'
ND
दहशतवाद आणि जागतिक आर्थिक मंदी यांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. कारण या दोन्ही संकटांवर मात करण्याची क्षमता केवळ भारताकडे आहे, असा अहवाल न्यूयॉर्कच्या एशिया सोसायटीने सादर केला आहे.
अमेरिका आणि आशिया यांच्यात मजबूत संबंधांची पाठराखण करणा-या या संस्थेने भारतासोबत मजबूत संबंधांची गरज असल्याचे सांगून म्हटले आहे, की आगामी वर्षांमध्ये भारत महत्वाचे शक्ती केंद्र असणार असून अमेरिकेला कोणत्याही जागतिक संकटांचा सामना करण्यासाठी भारताचे सक्रिय समर्थन महत्वाचे ठरणार आहे.
जागतिक संकटांचा मुकाबला करण्यासाठी, दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षितता नांदावी यासाठी, जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्यत्व देण्यासाठी आणि कट्टरपंथी मुस्लिम दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी भारत हे जगाचे आशा स्थान असणार आहे. त्यामुळे अमेरिकेचे भारताशी चांगले संबंध असणे गरजेचे असल्याचे या अहवालातून सांगण्यात आले आहे.