गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (18:29 IST)

प्रचंड बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार,जनतेने विकासाला मत दिलं - योगी आदित्यनाथ

Thanks to the people for giving huge majority
उत्तर प्रदेशातल्या विजयानंतर योगी आदित्यनाथांची सभा.उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करतंय. विजय दृष्टीपथात आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
जनतेचे आभार मानताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. आदरणीय पंतप्रधानांचे, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षांचे, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो."
 
"संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या नजरा उत्तरप्रदेशच्या निकालाकडे लागल्या होत्या. उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत दिल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच आज भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. मतमोजणीबाबत भ्रामक प्रचार केला जात होता, मात्र उत्तर प्रदेशातील जनतेने भारतीय जनता पक्षालाच विजय मिळवून दिला आहे."