उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण?सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांचा पराभव
भाजप पुन्हा एकदा उत्तराखंडमध्ये इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. पक्षाला येथे स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, खुद्द भाजप नेते आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांची जागा वाचवता आलेली नाही. खतिमा मतदारसंघातून त्यांचा काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी पराभव केला आहे. धामी यांच्या पराभवाबरोबरच उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांच्या पराभवाची साखळीही कायम राहिली. आधी भुवनचंद्र खंडुरी, नंतर हरीश रावत आणि आता मुख्यमंत्री असताना पुष्कर सिंह धामी यांना आपली विधानसभेची जागा वाचवता आलेली नाही.
धामी यांच्या पराभवामुळे आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री चेहरा कोण होणार याचीही चर्चा रंगली आहे. वास्तविक, निवडणुकीच्या सहा महिने आधी भाजपने येथील तीन मुख्यमंत्री बदलले होते.