नरेंद्र मोदीं पाठोपाठ सोनिया-राहुल गांधीही महाराष्ट्रात!
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा प्रचार करण्यासाठी राज्यात मुख्य शहरात सभा घेत आहेत. मोदींच्या पाठोपाठ कॉंग्रेसने देखील काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारसभांना आमंत्रित केले आहे.
सोनिया आणि राहुल यांच्या सभांना राज्यात आठ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. दोन्ही ज्येष्ठ नेते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
राहुल हे बुधवारी कोकणातील महाडमधून प्रचाराला सुरुवात करतील. नंतर दुपारी साडेतीनला लातूर जिल्ह्यातील औसा येथे सभा घेणार आहेत.