शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Updated :कोल्हापूर , गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (16:59 IST)

महाराष्ट्र आधीच गुजरातपेक्षा पुढे- सोनिया गांधी

महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा सगळ्यात जास्त विकास झाल्याचा विरोधक धिंडोरा पीटत आहे. परंतु त्यांना माहित नाही की, महाराष्‍ट्र आधीच गुजरातपेक्षा पुढे आहे, असे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सोनिया गांधी आज (गुरुवारी) कोल्हापूर येथील सभेत संबोधित केले. सोनिया यांनी महाराष्ट्र विधानसभा प्रचाराची सुरुवात केली. दुपारी ओरंगाबादेत सभा आहे.

मोदी सरकारने पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल सोनिया गांधी यांनी यांनी विचारला. तसेच भाजपने देशातील जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप सोनियांनी केला. 100 दिवसांमध्ये काळा पैसा भारतात परत आणण्याचा दावा भाजपने केला होता. परंतु, भाजप  काळा पैसा भारतात आणण्यात अपयशी ठरला.

भाजपने देशातील भोळ्या-भाबड्या जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांनी फसवले आहे. मात्र, महाराष्ट्र  विधानसभेच्या निवडणुकीत जनता भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही. कॉंग्रेस सत्तेत असताना महाराष्‍ट्राचा विकास झाला असल्याचेही  सोनिया गांधी यांनी सांगितले.