बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विजय तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

नाटककार विजय तेंडूलकर यांचे निधन

मराठी नाटकांमधून परखड मत व्यक्त करणारे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडूलकर यांचे आज पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना 'मिन्स्थेनिया ग्राईस' या आजाराने ग्रासले होते. काल अचानक त्यांचा आजार बळावल्याने त्यांना पुण्यातील प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री अचानक त्यांची श्वसनक्रिया थांबल्याने त्यांचे निधन झाल्याचे प्रयाग रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती.