विंदांची कविता
- अमोल कपोले
"
मी"च्या वेलांटीचा सुटो सुटो फासजीव कासावीससत्यासाठीअसं सहज लिहून जाणार्या विंदांची कविता ही जुन्याच्या आवरणात नव्याची सुनीते गाणारी अशी आहे. एकाचवेळी संवेदनशीलता, भावनोत्कटपणा आणि वैचारिक अधिष्ठान अशा तीन डगरींचा समतोल तीत सांभाळला गेला आहे. त्यात साधी भासणारी शब्दकळा, पण वैश्विक आशय घेऊन येते, कारण विंदांच्या जीवनात मार्क्सवाद आणि मानवतेला महत्वाचं स्थान होतं. त्यामुळेच, स्वातंत्र्याला झालास्वार्थाचा हा क्षयनागड्यांना न्यायमिळेचना. मानवांचे सारे माकडांच्या हातीकुलुपेंच खातीअन्नधान्य असे परखड भाष्य त्यांच्या कवितेत आढळते.
विज्ञानावर श्रद्धा दर्शवतानाच निष्क्रीय भक्तीवरच भाष्यही विंदांच्या कवितेत आढळतं. विंदांचे "आततायी अभंग" याबाबतीत खासच. उदा. करिता आदरें सद्गुरुस्तवनज्यांनी सत्यज्ञानवाढविले धन्य पायथॅगोरसधन्य तो न्यूटन धन्य आइन्स्टीन ब्रहृमवेत्ता सद्गुरुंनी द्यावेदासा एक ज्ञानमाझे दासपण नष्ट होवोआणि प्रयत्नवादाचा पुरस्कार करणार्या या ओळी - सद्गुरुवाचोनी सापडेल सोयतेव्हा जन्म होयधन्य धन्य विंदांची कविता जीवनातील नावीन्याची ओढ व्यक्त करणारी आहेच, संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळेत्या स्वप्नाचे शिल्पकार,कवि थोडे कवडे फारपडद्यावरच्या भूतचेष्टा;शिळा शोक, बुळा बोधनऊ धगे एक रंग,व्यभिचाराचे सारे ढंगपुन्हा पुन्हा तेच भोगआसक्तीचा तोच रोग पण तिला आसक्तीचेही वावडे नाही, शपथ तुला अंगाचीअंगांतिल संगाचीशपथ तुला रेतीचीभिजलेल्याशपथ तुला मेंदीचीहिरमुसल्याशपथ नजरबंदीचीत्या पहिल्या धुंदीचीशपथ तुला तहानेचीशपथ तुला तृप्तीचीशपथ तुलाशपथ तुलाशपथ तुला सरतीची, भरतीची. या ओळी पण विंदाच लिहून जातात. विंदांची शब्दकळा कधी अगदी अनपेक्षित प्रतिमा समोर आणते - धुक्यात उठले करपट शत्रूधुक्यांत मिटले करपट मित्रकिंवा सूख करपले ओठांवरती आणि दु:खही, फक्त थुकीलावास राहिला झालेल्याचा फक्त्त स्मृतीची उरली लीला किंवा ओठांच्या काठांवर आहेकुबड काढूनी बसला कोणी दुडदुडणारे शब्द छबुकडे लांब लांब नाकाने अडवित.
विंदांची "तालचित्रे" ही सुद्घा अनुभवण्याचीच गोष्ट आहे. झपताल पहा - ओचे बांधून पहांट उठते... तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून दोन डोळे उमलू लागतातआणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतोम्हणून तो तुला हवा असतो! मधून मधून तुझ्या पायांमध्येमाझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात, त्यांची मान चिमटीत धरुन तू त्यांना बाजुला करतेस. तरीपण चिऊ काऊच्या घासांमधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तुंमध्येतुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,वाढतांना "यक्षिणी"असतेस, भरवतांना "पक्षिणी" असतेस, साठवतांना "संहिता" असतेस, भविष्याकरता "स्वप्नसती" असतेस. ....
संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्राचपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. विंदांची बालगीते आणि ललितनिबंध हे तर त्या त्या साहित्यप्रकारातले मैलाचे दगडच आहेत. ग्लोबलायझेशनचं नावही कुणी ऐकलं नसेल, अशा काळातच विंदांच्या दृष्ट्या प्रतिभेने आपल्या कवितेतून ग्लोबलायझेशनचे मांडलेले चित्र पहा - मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगाऱ्हाईनमध्ये नंगाकरो स्नान सिंधूसाठी झुरोऍ़मेझॉन थोरकांगो बंडखोर टेम्ससाठी नाईलच्या काठी रॉकी करो संध्यासंस्कृती अन वंध्यानष्ट होवो ...
रक्तारक्तातील कोसळोत भिंतीमानवाचे अंतीएक गोत्र अशा या विंदांच्या विश्वव्यापी प्रतिभेला लाख लाख सलाम!