जन विजन झाले आम्हा Download जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ || पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ || वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ || आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ ||