शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

वजन कमी करा, वय वाढवा!

ND
जर तुम्ही लठ्ठ असाल आणि वजन कमी करायचे असेल तर ते आता फार कठीण काम राहिलेले नाही, वजन कमी करण्यासाठी लोक कडक उपास करतात, काही लोकं गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात, पण हे दोघेही प्रकार न करता मध्यम मार्गाचा अनुकरण करायला पाहिजे.

ND
जरूरी टिप्स : जेवण आणि व्यायामामध्ये संतुलन कायम ठेवणे फारच गरजेचे आहे, अन्यथा कुठल्याही प्रकारचा व्यायाम फलदायी ठरणार नाही. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्य पदार्थांवर लक्ष्य देण्यापेक्षा आपले मन दुसरीकडे वळवणे जरूरी आहे. पाण्याचे सेवन जास्तीत जास्त करावे.

डाइटवर कंट्रोल करणे : सर्वप्रथम भोजनाची मात्रा कमी करून जेवणात सलाडाचा वापर करावा. स्पायसी व गरीष्ठ भोज्यपदार्थ खाण्याऐवजी ब्रोकली, कॅबिज आणि दुसऱ्या प्रकारचे सलाड खायला पाहिजे. दोन पोळ्यांची भूक नेहमी ठेवावी आणि दिवसातून दोन वेळा जेवण करायला पाहिजे बाकी वेळेस काहीही खाणे टाळावे. जेवण केल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायला पाहिजे.

ND
व्यायाम : जर पोहता येत असेल तर त्यासारखा दुसरा कुठला ही व्यायाम नसतो. पण पोहता येत नसेल तर मॉर्निंग वॉकसाठी एखाद्या बगिच्यात किंवा शांत वातावरणात जायला पाहिजे. आणि जर हे ही शक्य नसेल तर योगा करायला पाहिजे. पोहणं आणि पायी पायी चालणेसुद्धा योगाचाच एक रूप आहे.

योगा टिप्स : योगा ट्रेनरकडून शिकून सूर्य नमस्कार, त्रिकोणासन, कटिचक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, भुजंगासन, मत्स्यासन, हलासन, चक्रासन आणि हनुमानासन किंवा आंजनेय आसन करायला पाहिजे. जेवणाची मात्रा कमी करून नियमित योगा केल्याने नक्कीच तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल.