महिलांनाच योगभ्यासाची जास्त आवश्यकता!
काही महिला घरातील कामालाच व्यायाम समजतात. कामांमुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होतो परंतू, त्यांना शक्ती अथवा उर्जा मिळत नाही. उलट त्यांना थकवाच मोठ्या प्रमाणात येतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांनाही योगासनांची जास्त आवश्यकता आहे. कारण गर्भधारण, मुलांचं संगोपन, घरातील कामे हे त्यांनाच करावी लागतात. या कामात त्यांची जास्त ऊर्जा खर्च होत असते. ही उर्जा वाढवण्यासाठी त्यांना योगाभ्यास फार गरजेचा आहे.योगासनांनी शरीर लवचीक होते. नियमित योगासने केल्याने शरीराला सौंदर्य प्राप्त होत असते. योग्य आहार घ्यावा. त्यामुळे थकवा येत नाही. एक ना अनेक आजारांवर योगासने रामबाण उपाय आहेत. महिलांनी योगासने करण्यापूर्वी समजून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी:1
गर्भावस्थेत व मासिक पाळीच्या काळात योगासने टाळावित. प्रसुतीनंतरही 2 महिने योगासने करू नयेत. 2
महिलांनी हलका आहार घ्यावा. तेलकट, तिखट व शिळे पदार्थ टाळावेत.3
योगासने करतांना कांबळ अथवा चादरची व्यवस्थीत घडी करून त्यावर बसावे.4
योगाभ्यास करताना सैल कपडे परिधान करावे. घट्ट कपडे परिधान केल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थीत होत नाही.