शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

संमोहन शक्ती योगातून प्राप्त करा

ND
संमोहनाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल असते. गूढाच्या पातळीवर ते कुतूहल उतरते. वास्तविक संमोहन ही प्राचीन भारतीय विद्या आहे. तिला प्राचीन काळात 'प्राण विद्या' किंवा 'त्रिकाल विद्या' नावाने ओळखले जात होते. इंग्रजीत तिला 'हिप्नॉटिझम' असे म्हणतात.

यौगिक क्रियांचा उद्देश मन एकाग्र करून त्याला समाधीवस्थेत नेणे हा आहे. समाधीवस्थेत नेण्याच्या शक्तीलाच संमोहन असे म्हणतात. संमोहन शक्ती प्राप्त करण्याचे अनेक प्रकार आहेत.

ND
संमोहन म्हणजे काय?
संमोहनाचा संबंध वशीकरणाशी जोडला जातो. वशीकरण म्हणजे कुणाला तरी वश करण्याची विद्या. पण संमोहनाशी वशीकरणाचा संबंध जोडणे चुकीचे आहे. मनात अनेक स्तर असतात. त्यात असते एक आदिम आत्म चेतन मन. हे मन विचारही करत नाही आणि निर्णयही घेत नाही. या मनाचा संबंध आपल्या शरीराशी असतो. हेच मन आपल्याला आगामी काळात येणार्‍या धोक्याविषयी सचेत करून त्यापासून वाचण्याचे उपाय सुचवते. त्याला तुम्ही सहावे इंद्रीयही म्हणू शकता.

हे मन नेहमी आपल्या संरक्षकाच्या भूमिकेत असते. आपल्याला होणार्‍या आजाराचे संकेत ते सहा महिने आधीच आपल्याला देते. आजारी पडल्यानंतरही आपल्याला आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न करते. पण अहंकारामुळे आपण मनाच्या त्या इशार्‍यांकडे लक्ष देत नाही. या मनाला ऐकणे म्हणजेच संमोहन.

ND
मनाला ऐकण्याचा फायदा काय?
हे मन आपल्याला हर प्रकारची मदत करण्यास तयार असते. फक्त आपले समर्पण त्याच्या ठायी हवे. भूत आणि भविष्यकाळाला जाणून घेण्याची याची क्षमता असते. आपल्याबरोबर घडणार्‍या घटनांबाबत ते आपल्याला सावध करते. त्यामुळे तुम्ही ते धोकेही टाळू शकता. तुम्ही स्वतःचाच नव्हे तर दुसर्‍यांचाही आजार बरा करण्याची क्षमता प्राप्त करू शकता.

संमोहनाद्वारे मनाची एकाग्रता, वाणीचा प्रभाव व दृष्टी यांच्या माध्यमातून साधक आपले संकल्प पूर्ण करू शकतो. या माध्यमातून स्वतःच्या मनातील विचार दुसर्‍यापर्यंत न बोलता पोहोचविणे (टेलिपथी), दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे, अदृश्य वस्तू वा आत्मे यांना पहाणे, दुरच्या गोष्टी पहाणे हे साध्य करू शकता.

ND
या मनाला ऐकावे कसे?
प्राणायामातून प्रत्याहार व प्रत्याहारातून धारणा असा हे मन ऐकण्याचा प्रवास आहे. आपले मन शांत, स्थिरचित्त झाल्यास तुम्ही तुमच्या इंद्रियातून अगदी वेगळा अनुभव घेऊ लागाल. असा अनुभव सामान्यजनांना येत नाही. ही साधना करण्यासाठी तुम्हाला त्राटकही करावे लागेल. त्राटकाचेही अनेक प्रकार असतात.

ध्यान, प्राणायाम व नेत्र त्राटकाद्वारे संमोहन शक्ती जागृत केली जाऊ शकते. त्राटक उपासनेला हठयोगात दिव्य साधना असे म्हटले आहे. या साधनेविषयी माहिती घेऊन एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ही साधना करावी. मनाला सहज कवेत आणता येईल. पण त्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी प्राणायाम व ध्यान गरजेचे आहे.

इतर प्रकार-
काही लोक अंगठा समोर ठेवून, काही लोक स्पायरल, काही लोक घड्याळाच्या हलत्या दोलकाकडे लक्ष देऊन, काही लोक लाल बल्बकडे एकटक बघून तर काही जण मेणबत्तीकडे एकटक लक्ष देऊन ही साधना करतात. पण हे किती योग्य ते सांगता येत नाही.

योग पॅकेज-
नियमित सूर्य नमस्कार, प्राणायाम व योगनिद्रा करून ध्यान करा. ध्यानात विपश्यना व नादब्रह्मचा वापर करावा. प्रत्याहाराचे पालन करून धारणेला साध्य करण्याचा प्रयत्न करावा. संकल्प प्रबळ असेल तर हेही तुम्ही साध्य करू शकाल. पण त्यासाठी योग्य अशा योग शिक्षकाकडे किंवा संमोहन तज्ज्ञाकडे जा. त्याच्याकडून नीट माहिती घेऊनच या साधनेकडे वळा.