काश्मीरमध्ये उद्योगांचं 10 हजार कोटींचं नुकसान
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर गेल्या तीन महिन्यात तेथील उद्योगांना मोठा फटका बसलाय. आतापर्यंत जवळपास 10 हजार कोटींचं नुकसान झालंय. काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेनं ही आकडेवारी दिलीय.
5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने कलम 370 रद्द केलं. त्या घटनेला 80 हून अधिक दिवस होत आहेत. या काळात काश्मीरमधील बाजारपेठा, वाहतूक बंद होती.
अलीकडच्या काही दिवसांत व्यवसायिक जगात थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण उद्योग-व्यवसायांची स्थिती अजूनही वाईटच आहे, असं काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शेख आशिक यांनी सांगितलं.
व्यवसायांना फटका बसण्यासाठी इंटरनेट सेवा बंद असणं हे मोठं कारण असल्याचंही शेख आशिक यांनी म्हटलं.