मुस्लिमांना राहण्यासाठी 150 देश, हिंदूंना एकच-विजय रुपानी
मुस्लिमांना राहण्यासाठी दीडशे देश आहेत, मात्र हिंदूंना एकच पर्याय आहे तो म्हणजे भारत, असं वक्तव्यं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलं आहे.
भाजपतर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ गुजरातमध्ये 62 रॅली काढण्यात आल्या. अहमदाबाद शहरात झालेल्या रॅलीत रुपानी बोलत होते.
पाकिस्तानात हिंदूंचं प्रमाण 22 टक्क्यांवरून 3 वर आलं आहे. बांगलादेशात हिंदू लोकसंख्येचं प्रमाण 2 टक्के आहे. मुस्लिमांना राहण्यासाठी दीडशे देश आहेत पण हिंदूंना एकच आहे, असं त्यांनी म्हटलं.
काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.