गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (11:20 IST)

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात घेणं हा भ्रष्टाचारच

ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्ट राजवटीचा ठपका देवेंद्र फडणवीस ठेवतात त्याच सरकारमधील ढीगभर नेत्यांना भाजपमध्ये घेतले हा राजकीय वर्तनातील आणि वैचारिक भ्रष्टाचारच आहे अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखतीत केली आहे.
 
"खरे तर फडणवीस सरकारने प्रसारमाध्यमांचे आभार मानायला हवेत की, त्यांच्या सरकारने-मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केला तो त्या प्रमाणात बाहेर नाही आला. हे सरकार भ्रष्टाचारमुक्त आहे तर मग चिक्की प्रकरण काय होते? सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित संस्थेचे कर्जप्रकरण, अनुदान लाटण्याचा प्रयत्न हे सारे काय होते? महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विधानसभेत कागदपत्रांनिशी जमिनीच्या व्यवहाराबाबत आरोप झाले. अशी अनेक उदाहरणे देता येतील." अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली आहे.