शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (16:22 IST)

'प्रकाश आंबेडकर, धमक असेल तर समोर या,राजांच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ'

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन गुरुवारी (8 ऑक्टोबर) उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली.
 
'एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत' असं ते म्हणाले.
 
त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
 
उदयनराजे यांच्या समर्थकांनी म्हटलं, "ज्या प्रकाश आंबेडकर यांनी सातारा शहरात सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम केलं नाही, त्यांनी आमच्या राजाबद्दल असे उद्गार काढणं योग्य नाही. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी वेळ आणि ठिकाण सांगावं, त्याठिकाणी आम्ही येऊ आणि राजेंच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देऊ."