शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2020 (15:23 IST)

महाराष्ट्रातल्या काही भागांत कोरोनाचा सामुदायिक संसर्ग सुरू झाल्याची शक्यता - डॉ. प्रदीप आवटे

मुंबईसह महाराष्ट्रात काही भागांमध्ये कोरोना व्हायरसचा सामुदायिक संसर्ग म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड झाल्याची शक्यता राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलीय. 
 
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या समूह (क्लस्टर) संसर्गाच्या घटना आढळल्या असून मुंबईत गेल्या काही दिवसांत रोज 700 ते 800 नवे रुग्ण आढळत आहेत. काही ठिकाणी सामूहिक संसर्गाचे पुरावेही आढळल्याचं डॉ. आवटेंनी म्हटलंय. पण काही ठिकणी हा सामुदायिक संसर्ग आढळला असला तरी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता आपल्याकडे समूह संसर्गाचं चित्र नसल्याचं डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलंय.
 
सामुदायिक संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रत्येक रुग्णाविषयीची माहिती गोळा करून त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागणार आहे.
 
शिवाय लोकसंख्येच्या घनतेमुळेच मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं डॉ. आवटे म्हणाले आहेत.