शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 29 एप्रिल 2019 (12:16 IST)

रामदास आठवलेंचा प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आक्षेप

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे.  
 
मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या भाजपच्या निर्णय घेतला आहे.
 
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर यांचे नाव आरोपी म्हणून आले आहे आणि हेमंत करकरे यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा होता, असे ठाकूर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले.
 
RPIने लोकसभा निवडणुकांसाठी मध्य प्रदेशात जबलपूर, सतना, रतलाम, मुरेना व सिधी या ठिकाणांहून उमेदवार उभे केले आहेत. तर उरलेल्या 24 मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले, असंही या बातमीत म्हटलं आहे.