शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (10:50 IST)

चिदंबरम यांना तिहारला न पाठवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

INX मीडिया गैरव्यवहारप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने जर माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये. त्याऐवजी त्यांना घरीच स्थानबद्ध करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 
शुक्रवारी न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली होती. सीबीआयने ही कोठडी वाढवून मागितली होती. पण चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी ते 74 वर्षांचे असल्याने त्यांना घरच्या घरी स्थानबद्ध करता येऊ शकतं. यात काही समस्या नसावी, असा युक्तिवाद केला.
 
सर्वोच्च न्यायालयाने तिहारमध्ये चिदंबरम यांना न पाठवण्याचे आदेश दिले तर ट्रायल कोर्टात त्यांना जामीन न मिळाल्यास ते सीबीआय कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत राहतील, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.