शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (09:46 IST)

चहावाला देशाचा पंतप्रधान झाला, पण त्यांच्या पक्षानेच चहापानावर बहिष्कार टाकला - उद्धव ठाकरे

एक चहावाला पंतप्रधान झाला त्याचा अभिमान आहे. पण त्यांच्याच पक्षाने चहावर बहिष्कार टाकला. हे त्यांच्या धोरणाशी किती सुसंगत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
 
ठाकरे म्हणाले, "नागपूरमध्ये मी यापूर्वी अनेकदा आलो आहे. पण, मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच आलो आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान आयोजित केलं जातं, असं माझे सहकारी जयंत पाटील यांनी मला सांगितलं. माझी अशी अपेक्षा होती की, प्रथा चहापानाची आहे. पण, या प्रथेमध्ये आणखी एक पोटप्रथा झाली आहे. ती पोटप्रथा म्हणजे विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे.
 
काँग्रेस आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यातील संबंधांचा दावा किती खरा?
आपल्या पंतप्रधानांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. एक चहावाला व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला. त्याचा आपल्याला अभिमान आहे. तो अभिमान बागळत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत. त्या पक्षानेच बहिष्कार टाकावा. त्यांच्यात मतभेद असतील असं मला वाटत नाही. पण पक्षाच्या धोरणाशी किती सुसंगत आहे?"