शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (21:58 IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पालिकांच्या निवडणुकीसाठी बैठकीचं आयोजन

MNS
महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. सगळेच पक्ष निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पालिकांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यासाठी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत पालिकांच्या निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
गेल्या विधानसभेत सपाटून मार खालल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पालिकेच्या निवडणुकीला सज्ज होणार आहे. मुंबई पालिकेसह अनेक महत्त्वाच्या पालिकांवर झेंडा फडकवण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे. राज ठाकरेही आता सक्रीय झाले असून ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
त्याचपार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबरला मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आले आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील रंगशारदा येथे ही बैठक होणार आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. ”अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा वाघ लागतो”. असं म्हणत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (mns MLA raju patil ) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. दरम्यान शिवसेनेच्या शिवाजी पार्कवर झालेल्या दसऱ्या मेळाव्याला आव्हान देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बीकेसीवर शिंदे गटाचा मेळावा घेतला. या मेळाव्यासाठी लोकांनी गर्दी केली मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून भाषण केल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor