गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन

ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर (६७) यांचं कर्करोगानं शुक्रवारी रात्री निधन झालं. अल्टर यांना त्वचेचा कॅन्सर झाला होता आणि तो चौथ्या स्टेजला पोहचला होता. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
टॉम अल्टर यांनी वीर-झारा, भेजा फ्राय, विरुद्ध, अलग, बोस, यासारख्या तीनशेहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं.
 
80 च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले होते. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं. कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.