सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 31 जुलै 2021 (15:44 IST)

दृश्यम चित्रपटाचे 6 वर्ष पूर्ण

दृश्यम हा 2015 चा हिंदी भाषेतील भारतीय चित्रपट आहे जो निशिकांत कामत दिग्दर्शित थ्रिलर-ड्रामावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत आणि कुमार मांगत पाठक,अजित आंद्रे आणि अभिषेक पाठक या चित्रपटाच्या निर्मितेचे सहभागी आहेत. हे मूळ लेखक जीतू जोसेफ यांच्या 2013 मल्याळम आवृत्ती चित्रपट दृष्यम चे अधिकृत हिंदी रूपांतर आहे.हिंदी आवृत्ती 31 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाली. आज या चित्रपटाला 6 वर्ष पूर्ण झाले.
 
या चित्रपटाचे कलाकार आहेत  
विजय साळगावकर, मिरज केबल नेटवर्कचे मालक च्या भूमिकेत अजय देवगण
श्रिया सरन विजयची पत्नी नंदिनी साळगावकर च्या भूमिकेत
मुख्य निरीक्षक मीरा देशमुख च्या भूमिकेत तब्बू
महेश देशमुख (मीराचा नवरा) च्या भूमिकेत रजत कपूर
अंजू साळगावकर (विजयची मोठी मुलगी) च्या भूमिकेत इशिता दत्ता
अन्नू साळगावकर (विजयची धाकटी मुलगी) च्या भूमिकेत मृणाल जाधव
प्रथमेश परब जोश च्या भूमिकेत, मिरज केबल नेटवर्कमध्ये विजयचे सहकारी
कमलेश सावंत - सहनिरीक्षक लक्ष्मीकांत गायतोंडे च्या भूमिकेत
ऋषभ चड्ढा - समीर देशमुख उर्फ ​​सॅम (महेश आणि मीराचा मुलगा)
अलेक्स,सॅम च्या मित्राच्या भूमिकेत विकास कुमार
झुबीन - झुबीन
शरद भाठोडिया - मार्टिन अंकल
 
ऑक्टोबर 2014 मध्ये मोहनलाल यांनी मल्याळम भाषेतील चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी सैफ अली खानला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर ही भूमिका अजय देवगणला देण्यात आली.