मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बरंय मला नवराच नाही...अन्यथा चितेमध्ये उडी घ्यावी लागली असते – तसलिमा नासरिन

अलीकडेच थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्यावर वाईट शब्दात अवहेलना करुन वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल रोहतगीचं नाव न घेता मुळची बांग्लादेशी ख्यातनाम लेखिका तसलिमा नासरिन यांनीही या वादात उडी घेतली आहे. 
 
तसलिमा नासरिन ह्यांनी ट्विट करत पायल रोहतगीवर टोळा मारत म्हटले आहे की बरयं मला नवरा नाही.
 
तसलिमा नासरिन यांनी ट्विट केले की असे ऐकण्यात आले आहे की सतीप्रथा पुन्हा सुरू व्हावी अशी काही भारतीय स्त्रियांची इच्छा आहे. हे खरंय का? बरंय की माझा नवराच नाही…त्यामुळे मला कोणीच पतीच्या चितेमध्ये उडी घेण्यासाठी जोर देऊ शकत नाही.
 
उल्लेखनीय आहे की पायल रोहतगीने ट्विट करत राजा राममोहन रॉय यांना ब्रिटीशांचा ‘चमचा’ होते, असे म्हटले होते. सती प्रथा ही हिंदू विधवांना वेश्यावृत्तीसून परावृत्त करण्यासाठी बनवली होती आणि ती अजिबात प्रतिगामी नव्हती. उलट या प्रथेला विरोध करणारे राजा राममोहन रॉय हे ब्रिटीशांचा चमचा होते. ब्रिटीशांनी सती प्रथेचा अवमान करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांचा वापर केल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले होते.