शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘पॅडमॅन’चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज

टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ हा चित्रपट घेऊन येतो आहे. मुळात बायोपिक असलेल्या या चित्रपटाचे अक्षयने जोरदार प्रमोशन चालवले आहे. काही वेळापूर्वी अक्षयने या चित्रपटाचे अर्धे पोस्टर आऊट केले आणि त्यानंतर काही तासांतच ‘पॅडमॅन’चे पूर्ण पोस्टर रिलीज करण्यात आले.
 
‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षयशिवाय सोनम कपूर आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील चित्रपटात भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे.
 
अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळविणाऱ्या अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा‘पॅडमॅन’ हा याच मालिकेतील चित्रपट आहे.