बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (10:53 IST)

‘एस. दुर्गा’च्या खुल्या प्रदर्शनावर निर्णय होणार

‘एस. दुर्गा’च्या खुल्या प्रदर्शनाबाबत सोमवारी भारतीय पॅनोरमा विभागाच्या परीक्षकांना तो दाखवून निर्णय घेतला जाणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन केवळ ज्युरी सदस्यांसाठी ठेवण्यात आले असून ‘इफ्फी’चे प्रतिनिधी अथवा पत्रकारांना मज्जाव करण्यात आला आहे. 

‘इफ्फी’चे संचालक सुनित टंडन यांनी वादग्रस्त ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सनल शशीधरन यांना ई- मेलद्वारे या चित्रपटाची 35 एम.एम. प्रिंट आणि सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर करण्यास  सांगितले होते. त्यानंतर शशिधरन यांनी ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र आणि पूर्ण 90 मिनिटे, 43 सेंकदांच्या चित्रपटाची कॉपी‘इफ्फी’ आयोजकांना सादर केली. 

 या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 50 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतातर्फे प्रतिनिधीत्व केले असून 10 पुरस्कार प्राप्त केले आहेत.