रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (18:14 IST)

सोनम कपूरने राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या पहिल्या पुस्तकाचे 'द स्ट्रेंजर इन द मिरर'च्या मुखपृष्ठाचे केले अनावरण!

राकेश ओमप्रकाश मेहरा एक असे नाव आहे जे मागील काही वर्षांपासून बॉलीवुडच्या अनेक उत्तम कालाकृतींसोबत जोडले गेले आहे. बहुआयामी लेखक-दिग्दर्शक, ज्यांनी इंडस्ट्रीला 'रंग दे बसंती', 'दिल्ली 6', आणि 'भाग मिल्खा भाग' सारख्या अनेक उत्तम चित्रपट दिले असून आता आपले आत्मचरित्र, द स्ट्रेंजर इन द मिरर च्या अनावरणासाठी सज्ज झाले आहेत, ज्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण सोनम कपूर हिच्या हस्ते करण्यात आले.
 
आत्मचरित्राचे फ़ॉरवर्ड ए. आर. रहमान यांनी लिहिले आहे ज्यांनी दिग्दर्शकासोबत 'रंग दे बसंती' आणि 'दिल्ली 6' सारखे दोन चित्रपट केले आहेत. पुस्तकासाठी ‘आफ्टरवर्ड’ आमिर खानने लिहिले आहे. सोनम आणि राकेश समीक्षकांद्वारे गौरवलेला चित्रपट 'दिल्ली 6' आणि 'भाग मिल्खा भाग' साठी एकत्र आले होते. अभिनेत्रीने आता आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या पूर्व-दिग्दर्शकाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले, ज्याला तिने कॅप्शन दिले आहे, "FIRSTLOOK"
 
रीता राममूर्ति गुप्ता या पुस्तकाच्या सह-लेखिका असून यामध्ये भारतीय सिनेमा आणि जाहिरात विश्वातील काही दिग्गज नावे- वहीदा रहमान, ए आर रहमान, मनोज बाजपेयी, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, सोनम कपूर, रवीना टंडन, रोनी स्क्रूवाला, अतुल कुलकर्णी, आर. माधवन, दिव्या दत्ता आणि प्रहलाद कक्कड़ सामील आहेत.  
 
हे पुस्तक 27 जुलैपासून संपूर्ण भारतात उपलब्ध होणार असून 20 जुलैपासून प्री-आर्डर करता येऊ शकेल. वर्तमानातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक-लेखकाच्या अंतर्दृष्टिला समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.