सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (08:54 IST)

‘एलियन सायन्स फिक्शन’मध्ये तापसी पन्नू

तापसी पन्नूकडे सध्या खरोखर चांगल्या स्क्रिप्ट आल्या आहेत. आता आणखीन काही चांगल्या विषयांवरचे सिनेमे तिला मिळणार असल्याचे समजते आहे. ‘एलियन' नावाच्या एका सायन्स फिक्शनमध्ये तिला मेन लीड रोल मिळाला आहे.
 
2019 मध्ये के-13'धून पदार्पण करणार्या बारथ नीलकंठन यांच्यावर या सायन्स फिक्शनची जबाबदारी आहे. या सिनेमाची स्टोरी तापसीला ऐकवण्यात आली आहे. परग्रहावरील सजीवांची ही कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. एलियन असे नाव जरी असले तरी या सिनेमावर हॉलिवूडमधील कोणत्याही सिनेमेचा अजिबात प्रभाव असणार नाही. ही पूर्णपणे वेगळी कथा असणार आहे. 
 
एकाचवेळी अनेक भारतीय भाषांमध्ये हा सिनेमा केला जाणार आहे आणि त्यात भरपूर स्पेशल इफेक्ट्स वापरलेले असणार आहेत. त्यामुळेच त्याच्या प्री प्रॉडक्शनवर खूप जास्त मेहनत घेतली जात आहे. सिनेमाच्या स्पेशल इफेक्टससाठी 10 कोटी रुपयांचे बजेट नि‍श्चित करण्यात करणत आले आहे. याव्यतिरिक्त तापसी ‘शाबास मिथू'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ‘पसीन दिलरुबा' आणि ‘रश्मी रॉकेट', ‘लूप लपोटा' आणि ‘दो बारह'हे तिचे काही आगामी सिनेमे आहेत.