सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (13:06 IST)

...आणि तिने हिसकावला रणवीरचा फिल्मफेअर पुरस्कार

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या Filmfare पुरस्कार सोहळ्यांची बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. रणवीर सिंहच्या 'गली बॉय' या चित्रपटाला यंदाच्या सोहळ्यात 13 पुरस्कार मिळाले. रणवीरचाही यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव करण्यात आला. ज्यानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा एका व्यक्तीने त्याचा पुरस्कारच हिसकावून घेतला. खुद्द रणवीरनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये त्याने एक फोटो पोस्ट करत त्यावर एक धमाल कॅप्शनही लिहिलं. रणवीरचा हा पुरस्कार हिसकावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, खुद्द त्याची पत्नी दीपिका पदुकोणच आहे. दीपिकाने फिल्मफेअरला हजेरी लावली नसली तरीही, रणवीर परतल्यानंतर मात्र तिने त्याच्या  पुरस्काराचं मानचिन्हं स्वतःकडे घेतलं.
 
दीपिकाचा अंदाज रणवीरला इतका भावला की त्याने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये दीपिका झोपलेली दिसत असली तरीही तिच्या चेहर्‍यावर सुरेख असं हास्य आहे आणि तिच्या   हातात फिल्मफेअर पुरस्काराचं मानचिन्हं आहे. 'व्हेन माय लिटील लेडी मेट माय ब्लॅक लेडी....' असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं. त्याचं हे कॅप्शन पाहता रणवीरचा पुरस्कार दीपिकाने हिसकावला असता तरीही तिचा हा गोड अंदाज मात्र सर्वांना भावला.