शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (10:13 IST)

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी 2022 विशेष: छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर दीर्घ आजारामुळे वयाच्या 50 व्या वर्षी झाले. त्यांच्या सह त्यांच्या चवथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती झाल्या. 
 
एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील. 
 
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. ते छत्रपती शहाजी राजे भोसले आणि राजमाता जिजाबाईंचे पुत्र होते. त्यांना शिवराय हे  नाव शिवनेरीच्या किल्यावर असणाऱ्या शिवाय देवी यांच्या नावावरून दिले. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी आई तुळजाभवानी असे. शिवराय आई तुळजा भवानीचे अनन्य भक्त होते. आई तुळजा भवानीने स्वयं प्रकट होऊन छत्रपती शिवरायांना तलवार दिल्याचे म्हटले जाते.   
 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापुरात आदिलशाही आणि मोगल साम्राज्याच्या विरोधात संघर्ष करून मराठा स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कमी मनुष्यबळाचा वापर करून गनिमीकावा युद्धनीतीचा वापर शत्रूला पराभूत करण्यासाठी केला. 
 
त्यांच्या सैन्यात मुस्लिम सरदार आणि सुबेदारांचा समावेश होता. त्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले त्यांच्या सैन्यात 30 ते 40 हजार घोडेस्वार, 1260 हत्ती आणि तब्बल एक लाख पादचारी सैन्याचा समावेश होता.  
 
3 एप्रिल रोजी त्यांचे दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा साम्राज्याचा सांभाळ केला.
 
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.