रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (15:39 IST)

1 हजार 317 नवे रुग्ण, 2 हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज

पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. दिवसभरात शहरात नव्याने 1 हजार 317 कोरोनाबाधित रुग्णांची तर 2 हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 47 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुण्याबाहेरील 26 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 706 इतकी झाली आहे. शहरात 1415 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 59 हजार 303  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 31 हजार 008  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 11553 इतके आतापर्यंत एकूण 23 लाख 64 हजार 171 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.
 
तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे