बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (09:41 IST)

राज्यात १३,७०२ नवे कोरोनाबाधित दाखल

राज्यात रविवारी दिवसभरात १३,७०२ नवे कोरोनाबाधित आढळले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 
 
रविवारी कोरोनामुळं दगावणाऱ्यांची संख्या ३२६ इतकी होती. तर, या दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा १५,०४८ इतका होता. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा इतका मोठा आकडा ही नक्कीच दिलासादायक बाब आहे असं म्हणायला हरकत नाही.  
 
दरम्यान, राज्यातील नव्या रुग्णांचा आकडा पाहता एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४,४३,४०९ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३८,०८४ मृत्यू आहेत. तर, ११,४९,६०३ रुग्णांना कोरोनावरील उपचारांनंतर रुग्णालयांतून रजा देण्यात आली आहे.