शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (16:46 IST)

जानेवारी, फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाटेची शक्यता

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे असं मत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सगळ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जि्ल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहा असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीत चाचण्या थांबवता येणार नाहीत असंही डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे. 
 
ताप, फ्लू यांसारखी लक्षणं दिसत असल्यास तर त्यासाठी वेळेत सर्वे केला गेला पाहिजे. रोज होणाऱ्या चाचण्या कोणत्याही परिस्थितीत थांबवता कामा नयेत. शहरी आणि ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक्स यांनी रोजचे अहवाल दररोज सादर करावेत. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवण्यास आरोग्य विभागाला मदत होईल. असं डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे.