1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (09:17 IST)

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर

ज्यात शुक्रवारी ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख  ९९ हजार ९६७ झाली आहे. दरम्यान कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४३  हजार ७१४  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १७ लाख ८७  हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७  हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६८ टक्के एवढा आहे.